मतमोजणीची तारीख 3 डिसेंबर 2023 (रविवार) वरून इतर कोणत्याही आठवड्याच्या दिवसात बदलण्याची विनंती करणार्या राज्यातील अनेक भागातील प्रस्तावांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही आयोगाने सांगितले. 3 डिसेंबर 2023 हा रविवार असल्याने मिझोरामच्या लोकांसाठी विशेष महत्त्व असल्याचे या प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांसह मिझोराममध्ये 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. आता मिझोरामच्या संदर्भात ही तारीख एक दिवस पुढे करण्यात आली आहे.
उत्तर-पूर्व राज्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. यावेळी राज्यात एकूण 174 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. येथील सर्व 40 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झाले होते. सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटचे प्रमुख आणि मुख्यमंत्री झोरामथांगा राजधानी ऐझॉलमधील ऐझॉल पूर्व-1 या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.