Wada paav recipe :महाराष्ट्रात वडा पाव मोठ्या आवडीने खातात. ह्याला बटाटा वडा देखील म्हणतात,आता हा वडा पाव जगप्रसिद्ध झाला आहे. बटाटा वड्याला पाव मधून कापून त्यात चटणी लावून ठेवतात आणि खातात.वडा पाव हा लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे आणि आता तुमची ही आवडती डिश फक्त 20 मिनिटांत घरी बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य:
लादीपाव, 4मोठे बटाटे, 5 हिरव्या मिरच्या, एक चमचा आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू ,तळण्यासाठी तेल,
फोडणीचं साहित्य – 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद
आवरणासाठी – 1 कप बेसन, आवश्यकतेनुसार पाणी, 1/2 टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
कृती :-
बटाटे शिजवून मॅश करुन घ्यावे. गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं -लसूण पेस्ट घालावी. नंतर त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावं. मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावं. शेवटी थोडा लिंबाचा रस घालावा. भाजी थंड होण्यासाठी ठेवा.
आवरणासाठी बेसनात मीठ, हळद, किंचित सोडा घालून भिजवून घ्यावे. बेसनाच्या सारणाला खूप फेणावे जेणे करून वडा मऊ बनतो.