मेथीची पातळ भाजी

साहित्य :-  एक जुडी मेथी, ताक एक वाटी किंवा दही अर्धी वाटी, डाळीचं पीठ पाव वाटी, लसूण पाकळ्या सात-आठ, सुक्या लाल मिरच्या चार, तेल पाव वाटी, फोडणीचं साहित्य, चवीपुरतं मीठ.
 
कृती :- सर्वप्रथम मेथी धुऊन बारीक चिरावी नंतर थोडं तेल बाजूला काढून उरलेल्या तेलाची फोडणी करावी. लसणाच्या पाकळ्या फोडणीत टाकाव्यात. त्या चांगल्या तळल्या गेल्या की लाल मिरच्या अख्ख्या किंवा दोन तुकडे करून टाकाव्यात व नंतर त्यात मेथीची चिरलेली भाजी घालावी. दोन-तीन मिनिटांनी मीठ घालावं. मेथी शिजत आल्यावर दुसऱ्या भांडयात ताक किंवा दही घेतल्यास ते पातळ करून त्यात डाळीचं पीठ कालवावं व त्याची एकजीव पेस्ट करावी. दोन वाटया पाणी त्या पेस्टमध्ये घालून ते सरसरीत मिश्रण मेथीच्या भाजीत घालावं व चांगलं रटरटू द्याव. पळीवाढी भाजी होऊ द्यावी. भाजी शिजल्यावर आधी काढून ठेवलेल्या तेलाची वेगळी फोडणी करून त्यात तीन-चार पाकळ्या लसूण ठेचून घालावा व ताटात भाजी वाढताना ही फोडणी त्यावर घालावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती