टोमॅटोचे लोणचे

साहित्य: लाल टोमॅटो 1 किलो, तेल 300 मि.ली., व्हाईट व्हिनेगर 200 मि.ली., लाल तिखट 5-6 टेबलस्पून, हळद 2 चमचे, हिरव्या मिरच्या 5, लसूण 50 ग्रॅम, आलं 50 ग्रॅम, मोहरीची डाळ 5 टेबलस्पून, जिरे 2 चमचे, मेथी 1 चमचा, कढीलिंब 15-20 पानं, मीठ साडेतीन टेबलस्पून.

कृती: मेथी तेलावर गुलाबी परता. टोमॅटो, मिरच्या बारीक चिरा. लसूण सोला. आलं सोलून घ्या. मेथी, आलं, लसूण, मोहरीची डाळ, जिरे थोड्या व्हिनेगरमध्ये वाटा. उरलेलं तेल गरम करून त्यात कढीलिंब, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वाटलेला मसाला परता. चिरलेले टोमॅटो, तिखट, हळद, मीठ घाला, परता. तेल सुटल्यावर उरलेलं व्हिनेगर घाला. लोणचं पूर्णपणे गार झाल्यावर स्वच्छ बाटलीत भरा.

वेबदुनिया वर वाचा