कृती-
सर्वात आधी टोमॅटो, कांदे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घ्या. आता एका पॅनमध्ये रवा घाला आणि मंद आचेवर ४-५ मिनिटे परतवा. रवा हलका गुलाबी झाल्यावर आणि सुगंध येऊ लागला की, गॅस बंद करा आणि रवा एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल घालून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, उडीदाची डाळ आणि कढीपत्ता घाला आणि तळा. शेंगदाणे घाला आणि ते कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. शेंगदाणे चांगले परतले की, बारीक चिरलेला कांदा घाला आणि हलका गुलाबी होईपर्यंत शिजवा. नंतर चिरलेला आले, हिरवी मिरची घाला आणि परतून घ्या. आता बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर वाटाणे आणि बीन्स घाला. भाज्या पूर्णपणे शिजवा. यानंतर, हळद, साखर आणि चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करा. आता ३ कप पाणी आणि १ टेबलस्पून तूप घाला आणि उकळी येऊ द्या. पॅनमध्ये भाजलेला रवा हळूहळू घाला आणि गॅसची आच कमी ठेवा. रवा ढवळत राहा जेणेकरून त्याचे गुठळ्या होणार नाहीत. रवा सर्व पाणी शोषून घेईपर्यंत शिजवा. आता टोमॅटो उपमा चांगले शिजेपर्यंत उकळा.यानंतर, गॅस बंद करा आणि तयार टोमॅटो उपमा एका भांड्यात काढून त्यावर कोथिंबीर गार्निश करा. व गरम टोमॅटो उपमा सर्व्ह करा.