चहासह हरभरा डाळीचे कुरकुरीत चिप्स घ्या, साहित्य आणि कृती जाणून घ्या

बुधवार, 4 मे 2022 (21:00 IST)
दररोज संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला आवडते. संध्याकाळी चहा सोबत घेण्यासाठी हरभरा डाळीचे कुरकुरीत चिप्स बनवा. हे आरोग्यासाठी हानिकारक नाही. बाजारातील चिप्स मध्ये फॅट आणि कॅलरी भरपूर प्रमाणात आढळतात.ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. पण घरात डाळीपासून तयार केलेले चिप्स आरोग्यासाठी चांगले असतात. कारण ते घरात तयार केले जातात. हे बनवायला अगदी सोपे असतात. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य
शंभर ग्रॅम हरभऱ्याची डाळ, पाणी, पन्नास ग्रॅम रवा, पन्नास ग्रॅम गव्हाचे पीठ, चाट मसाला, काळी मिरी, दोन वाट्या तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, लाल तिखट, चिमूटभर खाण्याचा सोडा. .
 
कृती -
हरभरा डाळ चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा डाळ रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी गाळून ठेवावे. ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक करा. ही ग्राउंड पेस्ट एका भांड्यात काढून ठेवा. नंतर त्यात रवा, गव्हाचे पीठ घालून मळून घ्या. पीठ मळताना अडचण येत असेल तर पाणी घाला. आता त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका. एक चमचा काळी मिरी, लाल तिखट एकत्र घाला. चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले मळून घ्यावे. नंतर हे पीठ पोळी सारखे लाटून घ्या. जर ते लाटताना  चिकटत असेल तर त्यावर थोडे कोरडे गव्हाचे पीठ घाला. 
 
नंतर ही लाटलेली पोळी  चिप्सच्या आकारात कापून घ्या. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर या सर्व चिप्स सोनेरी होईपर्यंत तळा. आता या चिप्स सॉस सह आणि चहा सह सर्व्ह करा. पाहुण्यांसाठी चहाच्या वेळेसाठी योग्य नाश्ता. डिप तयार करण्यासाठी मेयॉनीजचा वापर करू शकता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती