गुढीपाडवा हा खास दिवस कारण या दिवशी हिंदू शालिवाहन वर्षाची सुरुवात होते तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करत आम्ही गुढी उभारतो. या दिवशी काही विशेष पदार्थांचे सेवन करण्याची परंपरा आहे. या दिवशी गुढीला आपण कडुनिंबाच्या झाडाची डहाळी बांधतो, कडुनिंबाची चटणी खातो. तर चला जाणून घ्या की आरोग्यदायी चटणी कशी तयार केली जाते.
साहित्य - कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, हिंग आणि गूळ.
कृती - सर्व साहित्य एकत्रित वाटून घ्यावं. अनाशापोटी प्राशन करावं