साहित्य-
तेल - दोन चमचे
हिंग - १/४ टीस्पून
धणेपूड - एक टेबलस्पून
जिरे - एक टेबलस्पून
हिरवी मिरची - दोन चिरलेली
कोथिंबीर - दोन टेबलस्पून
बटाटे - दोन कप उकडलेले
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - एक टीस्पून
आमसूल पावडर - अर्धा चमचा
मिरे पूड - अर्धा टीस्पून
गरम मसाला - अर्धा टीस्पून
जिरे पूड - अर्धा टीस्पून
बेसन - एक कप
कॉर्न स्टार्च - अर्धा कप
ओवा - एक टीस्पून
हळद पावडर - अर्धा टीस्पून
बेकिंग सोडा - दोन चिमूटभर
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, धणे आणि जिरे घाला आणि काही सेकंद तडतडू द्या. आता हिरव्या मिरच्या, उकडलेले बटाटे, मीठ, तिखट, आमसूल पावडर, डाळिंबाचे दाणे, मिरेपूड, गरम मसाला, जिरे पूड घालावी आणि सर्वकाही चांगले मिसळा. व मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजवा. आता गॅसवरून पॅन काढा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या. आता बेसनाचे बॅटर तयार करून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून पिठात बुडवा आणि गरम तेलात सोडा. वडे मध्यम आचेवर थोडे तपकिरी होईपर्यंत तळा. आता तयार वडे एका प्लेट मध्ये काढा. तर चला तयार आहे आपली होळी विशेष बटाटा वडा रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.