मिक्स व्हेज सूप

साहित्य: किसलेले गाजर,  कॉलीफ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, कांदयाची हिरवी पात (बारीक चिरलेली), लसूण पेस्ट, तेल, मीठ, मिरपूड, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, कॉर्न स्टार्च, पाणी.
 
कृती: कढईत तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट घालून परता. आता सर्व भाज्या घालून 1 मिनिट मोठ्या आचेवर परता. आवश्यकतेनुसार पाणी घाला. चवीपुरते मिठ घाला. सूपला घट्टपणा येण्यासाठी थोड्या पाण्यात कॉर्न स्टार्च मिसळून तयार केलेली पेस्ट उकळत्या सूपमध्ये घाला. सारखे ढवळा म्हणजे गुठळ्या पडणार नाही. उकळून द्या. गॅस बंद करून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून ढवळा. सर्व्ह करताना वरून थोडी मिरपूड आणि कांद्याची पात घाला. चवीप्रमाणे यात सोया सॉसही घालू शकता.

वेबदुनिया वर वाचा