कुठल्याही अन्न पदार्थात हिरवी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबीरी मुळे अन्नाची चव वाढते. आपण कोथिंबिरीची चटणी खातो.शिवाय कोथिबिरीची वडी, देखील चविष्ट असते. आज आम्ही कोथिंबिरीची भाजीची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
कोथिंबीरीची भाजी बनवण्याचे साहित्य
दोन बटाटे, दोन वाट्या हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली. एक चतुर्थांश वाटी बेसन, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट आवश्यकतेनुसार तेल.
कृती-
हिरवी कोथिंबीरची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. नंतर त्यात चिरलेला बटाटा घालून तळून घ्या. हे बटाटे तळून झाल्यावर काढा. आता त्याच कढईत दोन वाट्या चिरून ठेवलेली कोथिंबीर घाला आणि मध्यम आचेवर परतून घ्या. नंतर कोथिंबीरीत लाल तिखट, हळद ,गरम मसाला आणि मीठ एकत्र घाला. नंतर त्यात बेसन घालून ढवळावे. दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्या.