भाकरीचे अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:41 IST)
बाजरी आणि मक्याची भाकरी योग्य प्रकारे घरी सहज बनवण्याची पद्धत जाणून घ्या-
 
आधी भाकरीच्या पिठात थोडे गव्हाचे पीठ मिक्स करावे.
पीठ चाळून घ्या.
कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या.
भाकरी बनवण्यासाठी योग्य आकाराचा  गोळा घ्या आणि हाताने मॅश करत मऊ करावा.
पीठ खूप कडक असेल तर त्यात पाणी घालून थोडे मऊ करावे.
आता पिठाचे गोल बनवावे आणि तळहातांच्या सहाय्याने थोडे-थोडे मोठे करावे.
तळहातावर पीठ चिकटत असेल तर थोडे पाणी लावून भाकरी पाचे ते सहा इंच मोठी करावी.
आता गरम तव्यावर भाकरी टाकून आणि उचटणेच्या मदतीने उलटावी.
जर तुम्ही अशा प्रकारे हाताने भाकरी बनवत नसाल तर तुम्ही इतर मार्गानेही देखील भाकरी तयार करु शकता.
यासाठी चाकावर जाड चौकोनी पॉलिथिन ठेवा.
पॉलिथिनवर पीठ लावून वरून पॉलिथिनने झाकून तळहाताने दाबून मोठी करा.
पॉलिथिनवर भाकर काढून तव्यावर ठेवा. तळापासून शिजल्यावर पलटी करा.
अशा प्रकारे तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी भाजून मंद आचेवर हलकी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या नंतर फुलक्याप्रमाणे थेट बर्नरवर भाजून घ्या.
आता भाकरीवर लोणी किंवा तूप लावा आणि हिरव्या भाज्या किंवा कोणत्याही रस्सा भाजीसोबत तसेच ठेच्यासोबत खा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती