हॉटेलसारखा स्वादिष्ट 'जिरा राईस' घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

शनिवार, 17 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
बासमती तांदूळ - एक कप 
तूप किंवा तेल -दोन टेबलस्पून
कोथिंबीर- दोन टेबलस्पून
जिरे - एक टीस्पून 
लिंबू - एक 
मोठी वेलची
लवंगा
काळी मिरी 
दालचिनीचा तुकडा 
मीठ चवीनुसार
ALSO READ: झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी
कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास पाण्यात भिजवा. अर्ध्या तासानंतर, तांदळातील जास्तीचे पाणी काढून टाका. एका भांड्यात तूप गरम करा, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि परतवून घ्या. आता त्यात संपूर्ण मसाले, दालचिनी, काळी मिरी, लवंगा आणि वेलची घाला व परतवून घ्या, आता भिजवलेले तांदूळ घाला.
तांदूळ मसाल्यांमध्ये मिसळा आणि चमच्याने सतत ढवळत दोन मिनिटे परतून घ्या. आता दोन कप पाणी घाला, मीठ घाला आणि लिंबाचा रस पिळून घ्या आणि तो भातामध्ये घाला व चांगले मिसळा, आता पाच मिनिटे मंद आचेवर तांदूळ शिजू द्या, साधारण पाच मिनिटांनी तांदूळ उघडा आणि ते तपासा.  तांदूळ पुन्हा झाकून ठेवा आणि मंद आचेवर साधारण पाच मिनिटे शिजू द्या, तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. व झाकून ठेवा सदाहरण १५ मिनिटे तसेच राहू द्या. आता तयार जिरा राईस वर कोथिंबिर गार्निश करा. तर चला तयार आहे आपला जिरा राईस रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उरलेल्या वरण-भातापासून बनवा स्वादिष्ट पकोडे रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती