मैक्रोनी आणि पास्ताने बनवा टेस्टी स्नेक्स

शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (13:10 IST)
साहित्य :
1 कप मैक्रोनी आणि पास्ता उकळलेले, 1/3 कप बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक कापलेला कांदा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ¼ चमचा हळद, ½ चमचा तिखट, चवीनुसार मीठ, एक पॅकेट मैगी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर.  
 
कृती :
सर्वात आधी मैक्रोनी आणि पास्ताला ऐका बाउलमध्ये घ्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तांदळाचे पीठ, बेसन, तिखट, कोथिंबीर, मैगी मसाला आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगल्या प्रकारे मॅश करा.  
 
आता तळहाताला तेल लावून छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या. एकीकडे कढई गरम करायला ठेवा. जेव्हा पूर्ण बॉल्स बनून जातील तेव्हा एक एक करून त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करा. तयार आहे गरमा गरम पकोडे. याला कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती