खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार

मंगळवार, 7 एप्रिल 2020 (15:25 IST)
साहित्य - 2 वाटी जाडं गव्हाचं पीठ, 1/2 चणा डाळीचे पीठ, 1/2 वाटी ताक, तेल, हींग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 बारीक चिललेले कांदे, कोथिंबीर, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर(चवीसाठी) गरम पाणी.
 
कृती- कढईत तेल करुन त्यात मोहरी, हींग, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. कांदा परतल्यावर गव्हाचे पीठ आणि चणा डाळीचे पीठ एकत्र करून टाकून खरपूस भाजावे. हळद, मीठ, तिखट, साखर घालावी. त्यामध्ये ताक घालून परतावे. खरपूस भाजल्यावर त्यात गरम पाणी लागत -लागत घालावे. वाफविण्यासाठी ठेवावे. अधून मधून हलवायचे आणि गोळे मोकळे करावे. तयार झाल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडीप्रमाणे वरुन कच्चा बारीक चिरलेला कांदा घालून सर्व्ह करावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती