आहारात सामील करा हे 5 पदार्थ, याने वाढेल आपली इम्युनिटी

सोमवार, 30 मार्च 2020 (12:15 IST)
इम्युनिटी सिस्टम, म्हणजे प्रतिकारक शक्ती एका दिवसातच वाढत नसते, त्यासाठीचे काही प्रयत्न करावे लागतात. आजचा धावपळीच्या काळात निवांत बसून व्यवस्थित जेवणे देखील शक्य नसते त्यातून दररोज सकाळी न्याहारी करणे दूरच पण सध्याच्या काळात आपल्याला आपली इम्युनिटी वाढवते अती गरजेचे आहे. त्यासाठी आपणास काही इम्युनिटी वाढवणारे पदार्थांची माहिती देत आहोत ज्याने आपली इम्युनिटी वाढेल आपण आपल्या नाश्त्यांमध्ये या काही पदार्थांचा समावेश करावा जेणे करून आपली इम्युनिटी वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या कोणते हे पदार्थ आहे. 
 
1 टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात. ह्याचा नियमित सेवनाने आपली इम्युनिटी वाढते.
 
2 लसूण - दररोज सकाळी लसणाच्या 2 पाकळ्यांच्या नियमित सेवन केल्याने रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रित राहते आणि आपली इम्युनिटी वाढते.
 
3 मश्रुम - ह्यामध्ये शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढविण्याचे गुणधर्म असतात. ह्याचा सेवन केल्याने आपली इम्युनिटी वाढते.
 
4 संत्री, लिंबू - हे पदार्थ आपल्या शरीरातील कुठल्याही प्रकाराचं इन्फेक्शनचा नायनाट करते आणि आपली इम्युनिटी वाढवते त्यामुळे आपल्या आहारात ह्याचा दररोज सेवन करावा.
 
5 बदाम - दररोज 8 -10 बदामाच्या सेवनाने आपली इम्युनिटी वाढते, तसेच बुद्धी देखील तल्लख होते. 
 
ह्याचबरोबर कडधान्य, गव्हाचा सांजा (दलिया), शेंगदाणे, ज्यूस, लस्सी, उकळलेली अंडी, ताक, ताजी फळे ह्याचा आपल्या सकाळच्या नाश्त्यात समावेश केला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात योग्य नाश्त्याने केली पाहिजे ह्यामुळे आपले शरीर आणि डोकं दोघांना व्यवस्थितरीत्या उत्तम पोषण मिळेल त्यामुळे आपली रोग प्रतिकार क्षमता वाढेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती