हिवाळ्यात फुलकोबी,मटार बीन्स अशा बऱ्याच भाज्या येतात. या भाज्या एकत्र करून चविष्ट व्हेज बिर्याणी बनवू शकता.सर्व भाज्या असल्यामुळे हे आरोग्यदायी देखील आहे. पाहुणे आल्यावर चटकन तयार होण्या सारखी सोपी रेसिपी जी सगळ्यांना आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
1 कप किंवा वाटी बासमती किंवा सादा लांब दाण्याचा तांदूळ,1 चिरलेली कांद्याची पात , 1 कप चिरलेले फ्लॉवर, 1 कप बॅक्ड बीन्स, 1 कप गाजर, 1/2 कप मटार, आलं,लसूण, 3 ते 4 कांदे चिरलेले,1 कप टोमॅटो प्युरी, पुदिनापाने, कोथिंबीर बारीक चिरलेली, 3 मोठे चमचे साजूक तूप, 1 कप दही, दालचिनी, तमालपत्र, लवंगा,तिखट, जिरे, मीठ चवीप्रमाणे, मोठी वेलची, गरम मसाला, गरजेप्रमाणे पाणी.
कृती-
तांदूळ धुऊन 10 मिनिटे भिजत घाला.एका कढईत तांदूळ शिजवण्यापुरते पाणी घालून शिजवताना त्यामध्ये मीठ, तमालपत्र, मोठी वेलची, लवंग आणि एक चमचा साजूक तूप घालून झाकून ठेवा.
एका पॅन मध्ये साजूक तूप घालून,त्यामध्ये हिंग,जिरा,आलं,लसूणपेस्ट, कांदा घालून मिसळा आणि सोनेरी रंग येई पर्यंत परतून वेलची आणि तमालपत्र, कोबी,गाजर,बीन्स घालून 2 ते 3 मिनिटे शिजवा. टोमॅटो प्युरी घालून ढवळा. हळद,मीठ,तिखट मटार आणि दही घालून तो पर्यंत शिजवा जो पर्यंत भाज्या शिजून मऊसर होत नाही. ह्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी कोळशाच्या तुकड्याला गरम करून वाटीत ठेवून भाज्यांच्या मध्ये ठेवा नंतर कोळशांवर साजूक तूप घालून भाजीवर 5 मिनिटे झाकण ठेवा नंतर झाकण काढून घ्या.