मुगाचे डोसे

बुधवार, 27 जानेवारी 2021 (09:14 IST)
साहित्य: एक वाटी मोड आलेले मूग, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, तेल, चवीप्रमाणे मीठ, जिरे पूड
 
कृती: मोड आलेले मूग जरा पाणी घालून बारीक वाटा. डोशाच्या पिठासारखे झाले की त्यात मीठ आणि आले-लसूण पेस्ट घाला. तव्याला तेलाचा हात लावून त्यावर मिश्रणाचे पातळ डोसे घाला. झाकण ठेवा. अंदाजाने डोसा उलटा आणि दुसर्‍या बाजूने शेकून घ्या. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा. हे कमी तेलात तयार होणारा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती