थंड पाणी, सरबत पिऊ नका, एसी लावू नका

मंगळवार, 31 मार्च 2020 (23:08 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा फेसबुक लाइव्ह या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला एकदा पुन्हा कोरोना संदर्भात सल्ले ‍दिले. या दरम्यान त्यांनी जनतेला एसीचा वापर न करण्याचा सल्ला दिला. कारण एसीमुळे करोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
तसेच त्यांनी थंड पाणी, सरबत पिऊ नका असाही सल्ला दिला आहे. उन्हाळा सुरु होत आहे आणि त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी साहजिक आहे मात्र शक्यतो ते टाळा. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की हे करोनावर उपाय म्हणून नाही तर सर्दी खोकल्याचा धोका टाळण्यासाठी सांगत आहे. 
 
त्यांनी जनतेला अॅलर्जीपासून दर राहण्याचा सल्ला दिला आहे. थंड पेय पिल्याने सर्दी, खोकला होण्याचा धोका वाढतो आणि ते टाळण्यासाठी त्यांनी असा सल्ला दिला.
 
तसेच त्यांनी सर्दी खोकल्याची लक्षणं आढळली तर शासकीय रुग्णालयात जा असे आवाहन केले आहे. अशात नेहमीच्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात गेल्याने करोनाची लक्षणे वेळीच कळून येतील तसेच इतरांनाही त्याची लागण होणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती