Delicious Rice Donuts Recipe :उरलेल्या भातापासून चविष्ट डोनट्स बनवा

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (22:20 IST)
संध्याकाळच्या चहासोबत थोडा नाश्ता मिळाला तर आनंदच आहे. बऱ्याचदा घरात जास्तीचा भात बनतो. मग तो उरलेला भात एकतर फेकून दिला जातो किंवा भाताला फोडणी देऊन फोडणीचा भात बनवला जातो. पण उरलेल्या भाताची एखादी चविष्ट रेसिपी देखील बनू शकते. आज आम्ही उरलेल्या भातापासून डोनट्स बनवण्याची रेसिपी सांगत आहोत.हे डोनट्स आपण चटणीसोबत खाऊ शकता आणि संध्याकाळी चहासोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती.
 
साहित्य -
उरलेला भात, रवा, दही, कांदा, हिरवी मिरची, धणे, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, काळी मिरपूड, ब्रेड, तेल    
 
कृती-  
उरलेल्या भातापासून डोनट बनवण्यासाठी सर्वप्रथम दही चांगले फेणून घ्या. नंतर उरलेला भात, रवा, दही, कांदा, हिरवी मिरची, धणे, ब्रेड मिक्सरमध्ये टाकून बारीक करून पेस्ट बनवा. आता त्यात मिक्स्ड हर्ब्स, मीठ, मिरपूड घाला. चांगली जाडसर पेस्ट बनवा. आता ही पेस्ट पाइपिंग बॅगमध्ये भरा. आता कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर पाइपिंगबॅगच्या मदतीने डोनटचा आकार तयार करा. दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आल्यावर कढईतून बाहेर काढा.भाताचे  चविष्ट डोनट्स खाण्यासाठी तयार आहेत. चटणीसोबत सर्व्ह करा. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती