रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्यासाठी या रेसिपी आणि कुकिंगच्या टिप्स फॉलो करा
सोमवार, 6 डिसेंबर 2021 (20:58 IST)
हिवाळ्यात, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. जर भाज्या आवडत नसतील तर आपण चविष्ट पदार्थ बनवून भाज्या खाऊ शकता. उदाहरणार्थ, पावभाजी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून ठेवू शकता. आज आम्ही रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्याची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य
2 चमचे तेल
1 कप कांदा, बारीक चिरलेला
1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
1/2 कप दुधी भोपळा, बारीक चिरलेला
1/2 कप शिमला मिरची
1 कप बटाट्याचे तुकडे
1/2 कप बीटरूट
3 टीस्पून पाव भाजी मसाला
1 टीस्पून लाल मिरची पावडर
1/2 कप टोमॅटो प्युरी
कोथिंबीर
बटर
पाव
कृती -
सर्वप्रथम कढईत तेल गरम करा . त्यात बटरच्या तुकड्यासह बारीक चिरलेला कांदा घाला.
कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या आणि त्यात आलं लसूण पेस्ट घाला. चांगले मिसळा.
आता त्यात चिरलेला दुधी भोपळा , कोथिंबीर आणि चिरलेला बटाटा घालून चांगले मॅश करा.
चिरलेला बीटरूट घाला, मीठ, लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालून चांगले मिसळून मॅश करा.
आता त्यात टोमॅटो प्युरी घाला.
टोमॅटो प्युरी मिक्स करून त्यात बटर घातल्यावर सर्व भाज्या मिसळून चांगल्या शिजू द्या. पौष्टिक आणि चविष्ट भाजी तयार.
पावावर बटर लावा .
पावावर पावभाजी मसाला शिंपडा.
कढईत पाव गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
रेस्टारेंट स्टाईल पावभाजी खाण्यासाठी तयार.
गरमागरम पावभाजी लिंबाचे तुकडे, कांदे आणि हिरवी मिरची घालून सर्व्ह करा.