कॉर्न कॅप्सिकम

साहित्य: 2 स्वीट कॉर्न, 3 शिमला मिरची, 2 कांदे, 2 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, 1 तुकडा आलं, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, तेल.
 
कृती: कुकरमध्ये पाण्यात एक चमचा मीठ आणि स्वीट कॉर्न घालून तीन शिट्ट्या घेऊन घ्या. गार करून दाणे सोलून घ्या. कांदे, मिरच्या, आलं याचं मसाला वाटून घ्या. कढईत तेल गरम जिरे, हळद घाळून त्यात मसाला भाजून घ्या. नंतर ‍उभ्या चिरलेल्या टोमॅटो आणि शिमला मिरचीच्या फोडी घाला. झाकून शिजू द्या. शिजत आलं की तिखट घाला. शिजल्यावर भुट्याचे दाणे ‍आणि गरम मसाला घाला. गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा