कृती-
सर्वात आधी एका भांड्यात क्रीम, दूध आणि साखर एकत्र करून गरम करा. दुसऱ्या बाजूला जिलेटीन कोमट पाण्यात विरघळून घ्या आणि क्रीमच्या मिश्रणात मिसळा. शेवटी त्यात रोज सिरप घालून नीट ढवळा. हे मिश्रण काचेच्या मोल्डमध्ये ओतून ४-५ तास फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा. वाढताना वरून गुलाबाच्या पाकळ्या टाका. या रेसिपीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यास स्वाद अधिक नैसर्गिक आणि छान येतो.