अर्धा चमचा बारीक साखर(पिठी साखर)
कृती-
भातामध्ये बेसन, दही, पाणी मिक्स करून बारीक वाटून घ्यावे. हे मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट, मीठ, पिठीसाखर, व रवा टाकून मिक्स करावे. मग काही वेळ ठेऊन इडली पत्रामध्ये इडली बनवतो तसे ठेवावे. वाफवल्यावर इडलीपात्रातून कडून थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने याचे छोटेछोटे पीस करावे. मग आता कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, तयार इडलीचे पीस टाकावे. यानंतर वरतून तिखट घालावे. आता हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाताचा हा चविष्ट नाश्ता सॉस सोबत सर्व्ह करावा.