रमजानमध्ये बनवा वेज शामी कबाब रेसिपी

मंगळवार, 14 जून 2016 (13:57 IST)
रमजानमध्ये इफ्तारच्या वेळेस सर्वात आधी स्‍टार्टर सर्व्ह केले जातात. अशात जर तुम्ही कोणती रेसिपी शोधत असाल तर वेज शामी  कबाब नक्की बनवा. शामी कबाब काळे चणे उकळून तयार केले जातात. यांना गरम सर्व्ह करा आणि सोबत पुदिन्याची चटणी देणे विसरू नका.  
 
साहित्य : 1 कप भिजलेले काळे चणे, 1 माध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला, 1 चमचा चिरलेले पुदीनाचे पानं, 1 चमचा बारीक कापलेली कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, ½ चमचा तिखट, 1 हिरवी मिरची चिरलेली, ½ चमचा आलं पेस्ट, ½ चमचा गरम मसाला, 2 चमचे बसेन, मीठ वे तळण्यासाठी तेल.  
 
कृती : सर्वप्रथम भिजलेले काळे चण्याला पाण्याने स्वच्छ धुऊन मीठ घालून प्रेशर कुकरामध्ये पाणी घालून शिजवून घ्या. नंतर त्यांना का भांड्यात काढून मोठ्या चमच्याने क्रश करून घ्या. हे मिश्रण थोडे जाडसर असायला पाहिजे. नंतर यात बाकी सर्व साहित्य घालून मिक्स करून त्यांना गोल गोल कबाबाचा शेप द्या. आता कढईत तेल गरम करून कबाबाला तळून घ्या. जेव्हा कबाब दोन्ही बाजूनं लाल होतील, तेव्हा त्यांना प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्हाला वाटल्यास कबाबाला ओव्हनमध्ये देखील बेक करू शकता. कबाबाला पुदीन्या पानांनी सजवून सर्व्ह करा. सोबत लिंबाची स्लाइस, कांदा आणि पुदिन्याच्या चटणी देणे विसरू नका. 
 
नोट: जर कबाब तेलात टाकल्यावर तुटत असतील तर त्या थोडे बेसन मिसळा

वेबदुनिया वर वाचा