भरडा भाजी

ND
साहित्य : 2 वाटी चणा डाळीचा भरडा, 1/2 लहान चमचा लसणाची पेस्ट, आले पेस्ट, धने-जिरे पूड अर्धा चमचा, 3-4 लाल मिरची, 1 वाटी कोथिंबीर किंवा मेथी वाळलेली, 1/2 वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, कडीपत्ता व हिंग.

कृती : प्रथम गरम कढईत तेल, मोहरी, जिरे घालून फोडणी करा. मिरचीचे तुकडे घाला. आले लसूण पेस्ट, कढीपत्ता व हिंग घाला. हालवा. पाणी फोडणीला घाला, पाण्यामध्ये वाळलेली मेथी, तिखट, मीठ, धनेपूड व जिरेपूड घाला, पाणी उकळल्यावर चण्याचा भरडा घाला. मंद गॅस ठेवून हळूहळू हलवत रहा. घट्ट वाटल्यास थोडा पाण्याचा शिपका मारा. हालवा झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. भरडा भाजी तयार होईल. हा भरडा पोळी किंवा भाकरी सोबत छान लागतो.

वेबदुनिया वर वाचा