उब्जे (व्हिडिओ पहा)

बुधवार, 4 नोव्हेंबर 2015 (15:03 IST)
साहित्य: दोन वाट्या तांदूळाची कणी, 4 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर, एक वाटी शेंगदाणे, लहान अर्धी वाटी भाजकी डाळ, अर्धी वाटी खोवलेला नारळ, लिंबू.

कृती: तांदूळाची कणी सात-आठ तास भिजवावी. निथळून घ्यावी. थोडं जास्त तेलात फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लाल मिरच्या, शेंगदाणे, डाळ टाकून परतावे. निथळलेले तांदूळ घालून परतावे. पाण्याचा शिपका देऊन शिजवावे. मीठ व साखर घालून पुन्हा परतावं. वरून लिंबू रस टाकावं, खोबरं-कोथिंबीर घालून सजवावं.


वेबदुनिया वर वाचा