ज्योतिष व वास्तुशास्त्राची सांगड

सध्या आधुनिक पध्दतीने घरे बांधली जातात. त्यासाठी एका चांगल्या शिकलेल्या, अनुभवी, कुशल इंजिनिअरची, वास्तू विशारदाची गरज आहे. त्यांच्या तांत्रिक सहकार्याशिवाय घर बांधणे श्रेयस्कर नाही.

ही घरे नक्कीच सुंदर व मजबूत असतात. पण निसर्गानुरूप नसतात. शहरात व महानगरात आपण याचे भयावह परिणाम पहात आहोत. त्यापासून वाचण्यासाठी घरे नैसर्गिक रितीने बांधण्यात यावीत. अर्थात वास्तुशास्त्राच्या नियमांच्या आणि सिध्दांतांच्या आधारे गृहबांधणी करावी. जमिनीची निवड, घराचा योग्य दिशेशी असणारा ताळमेळ, जमिन मालकाच्या जन्म नक्षत्रानुसार मुख्य दाराचे ठिकाण, सूर्यप्रकाश व हवेचे योग्य वातानुकूलन तसेच घर बांधल्यानंतर होणार्‍या परिणामांची माहिती असणे आवश्यक असते.

भारतीय पंचांग
पंचांग या शब्दाचा अर्थ म्हणजे पाच अंग. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण व योग. भारतीय पंचांग दोन गोष्टींवर आधारीत आहे. ती म्हणजे चंद्राची भ्रमण कक्षा पृथ्वीच्या संदर्भात. (अमुक राशी स्थिते वर्तमान श्री चंद्रे) कारण चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. आणि सूर्याच्या संदर्भात पृथ्वीची गती. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (अमुक राशी स्थिते वर्तमाने श्री सूर्ये)

पक्ष :
एका महिन्यात दोन पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्णपक्ष. दोन्ही पक्षात पौर्णिमा व आमावसेशिवाय इतर तिथींची नावे सारखीच असतात.

शुक्ल पक्ष :
आमावस्येनंतरची प्रतिपदा ते पौर्णिमा या काळात येणार्‍या तिथीला शुक्ल पक्षीय तिथी म्हणतात.

कृष्ण पक्ष :
पौर्णिमेपासूनची प्रतिपदा ते आमावस्येपर्यतच्या तिथीला कृष्ण पक्षीय तिथी म्हणतात.

तिथी :
ज्यातिषशास्त्रात चंद्राच्या प्रत्येक कलेला एक तिथी मानतात. तिथीची गणना शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते.

तिथीची नावे :
प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चर्तुदशी, चर्तुदशी नंतर शुक्ल पक्षाच्या पंधराव्या तिथीला 'पौर्णिमा' तर कृष्ण पक्षाच्या तिसर्‍या तिथीला आमावस्या म्हटले जाते.

तिथ अंकात लिहिली जाते. पौर्णिमेपर्यंत हा क्रम १ ते १५ अशा क्रमाने चालतो. पण त्यानंतर पुन्हा १ पासून लिहिले जाते आणि ज्या दिवशी आमावस्या असते त्या तिथीला तीस हा अंक लिहिला जातो.

खालील कोष्टकात शुक्लपक्ष व कृष्णपक्षातील तिथीचे अंक दाखवले आहेत :-

तिथी बोधन चक्र
तिथींचे अंक
कृष्ण पक्ष
तिथींचे अंक
शुक्ल पक्ष
01
प्रतिपदा
01
प्रतिपदा
02
द्वितीया
02
द्वितीया
03
तृतीया
03
तृतीया
04
चतुर्थी
04
चतुर्थी
05
पंचमी
05
पंचमी
06
षष्ठी
06
षष्ठी
07
सप्तमी
07
सप्तमी
08
अष्टमी
08
अष्टमी
09
नवमी
09
नवमी
10
दशमी
10
दशमी
11
एकादशी
11
एकादशी
12
द्वादशी
12
द्वादशी
13
त्रयोदशी
13
त्रयोदशी
14
चर्तुदशी
14
चतुर्दशी
30
आमावस्या
15
पौर्णिमा

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा