Shani Trayodashi Puja Vidhi 2024 या वर्षी शनि त्रयोदशी व्रत शनिवार, 28 डिसेंबर रोजी होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाची आराधना केल्याने शनिदोष दूर होतो आणि साडेसाती आणि ढैयामध्येही आराम मिळतो, असे मानले जाते. अशात शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाची पूजा कशी करावी, या दिवशी कोणते मंत्र जपावेत आणि पूजेची संपूर्ण सामग्री कोणती आहे हे जाणून घेऊया-
शनि त्रयोदशी 2024 पूजा साहित्य Shani Trayodashi 2024 Puja Sahitya
शनि त्रयोदशीला पूजा साहित्य म्हणून पाणी, काळे तीळ, काळा कपडा, काळ्या मोहर्या, लोखंडी वस्तू जसे कडा, शिक्का, इतर धातू, नीलम रत्न किंवा त्याऐवजी गोकर्णाचे फुल, मध, आवळा, काळी मिरी, मोहरीचे तेल, गंगाजल, दिवा, कापसाची वात इतर वस्तू सामील करा.
शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी Shani Trayodashi 2024 Puja Vidhi
ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करावे. नंतर पूजा स्थळ स्वच्छ करुन त्यावर एक चौरंग मांडून गंगाजलने शुद्ध करावे. तथापि शनिदेवाची प्रतिमा घरात लावत नाही अशात त्यांचे चित्र देखील लावणे निष्द्धि मानले गेले आहे. अशात शनिदेवाचे ध्यान करताना सर्व पूजेचे साहित्य त्यांचे प्रतीक म्हणून चौरंगावर व्यवस्थित ठेवावे.