वास्तूनुसार सजवा भाड्याचे घर

सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (08:09 IST)
भाड्याच्या घरात राहणार्‍यांना सजावटीत खूप अडचणी येतात. विशेषतः सारखी बदली होत असलेले लोक तर घराच्या सजावटीसाठी काहीच लक्ष घालत नाही. सहज हलवता येतील अशा मोचक्याच सजावटीच्या वस्तू ते घरात ठेवतात. भाड्याच्या घरात राहणार्‍या लोकांनाही घर सजवता येईल. त्यासाठीच्या या काही टिप्स. 
 
घर सजवताना...
* फर्निचर हलक्या वजनाचे बनवून घ्या. सोफ्याच्या जागी केन, रॉट आयरन-वूड कॉम्बिनेशन, मेकेनाइज्ड फर्निचर किंवा दिवाणखाण्यात भारतीय बैठकीसाठी गादीचा उपयोग करू शकतात. 
* सोफा बनवत असाल तर गादी वेगळी तयार करा. 
* स्थलांतर करताना तो सोफा वाहून नेताना त्यात इतर वस्तू बसतील अशाच पध्दतीने तो बनवला पाहिजे. 
* घराला न्यूट्रल रंग द्यावा जेणे करून तो प्रत्येक फर्निचरला शोभून दिसतो. 
* घरात प्रकाश राहावा म्हणून टेबल लॅम्प किंवा फुटर लॅम्प लावावा.
* घरात पडद्यांना खूप महत्त्व आहे. भाड्याच्या घराला रंग देण्यापेक्षा खराब झालेल्या भिंती झाकण्याकरता पडदे लावता येतात. 
* पडदे चांगल्या रंगाचे घ्यावे. कारण पुन्हा घर बदलताना ते कामात येऊ शकतील. 
* फोल्डिंग डायनिंग टेबल बहूउपयोगी असते. ते तुम्ही कुठल्याही खोलीत ठेवू शकता.  
* घरात सिल्क प्लॅट ठेवा. ते फार सुंदर दिसतात. सहज हलवता येतात.
* बेडमध्ये स्टोरेज बनवा कारण सामान नेताना अडचणी निर्माण होत नाही. 
* भाड्याच्या घरात महागडे व भारी वजनाचे फर्निचर तयार करून नका. 
* खोली बर्‍यापैकी मोठी असेल तर दोन बैठका करता येऊ शकतात. 
* घर बदलत असताना घरात कोणत्या वस्तू आहेत व त्या कुठे ठेवल्या आहेत याची व्यवस्थित यादी करून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती