बाथरुममध्ये सैंधव मीठ ठेवल्याने शुभ संकेत मिळतात

बाथरूम हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग आहे. स्नानगृह स्वच्छ आणि हवेशीर असावे. इथे थोडीशी घाण किंवा वास्तुदोष असेल तर नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जर तुम्हाला घरात सुख, शांती आणि प्रेम हवे असेल तर बाथरूमचा छोटासा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो.
 
1. आपल्या बाथरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये सैंधव मीठ ठेवावे. असे केल्याने दारिद्रय दूर होतं.
 
2. घरातून निघताना जर आपल्या भरलेल्या सैंधव मिठाची वाटी दिसली तर आपल्या शुभ बातमी कळणार असे समजावे.
 
तर चला जाणून घ्या मीठ कोणत्या दिशेला ठेवावे?
 
1. वास्तु शास्त्राप्रमाणे घरात पैसा येत राहावा म्हणून काचेच्या भांड्यात मीठ भरुन बाथरूमच्या नैऋत्य कोपर्‍यात म्हणजेच दक्षिण-पश्चिम कोपर्‍यात ठेवावे. याने पैशांचा प्रवाह वाढतो.
 
2. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वातावरणात पवित्रता वाढते सोबतच लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुलतात.
 
3. जर बाथरूममध्ये मीठ ठेवणे शक्य नसेल तर काचेच्या ग्लासात मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोण म्हणजे दक्षिण - पश्चिम कोपर्‍यात ठेवावे.
 
4. बाथरूममध्ये एक वाटीत मीठ ठेवल्याने नात्यात प्रेम आणि सकारात्मकता येते.
 
5. बाथरूम घाणेरडं किंवा वास्तु दोष असल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि मग समस्या सुरु होतात. आपण परेशान राहू लागतो. अशात मिठाने फायदा होऊ शकतो.
 
6. हा उपाय केल्याने घरातीतल नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मात्र हे मीठ आपल्याला दर 15 दिवसात बदलून द्यायला हवे.
 
7. आपण आपल्या टॉयलेट आणि बेडरुममध्ये देखील सैंधव मिठाचा लहान तुकडा ठेवू शकता. याने कुटुंबात प्रेम वाढतं. गृह कलह दूर होतात.
 
बाथरूममध्ये कोणत्या दिवशी मीठ ठेवले पाहिजे- 
 
1. मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी बाथरूममध्ये मीठ ठेवणे योग्य ठरेल.
 
2. मंगळवारी हनुमानाचे नाव घेऊन बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास घरात प्रवेश करणार्‍या नकारात्मक ऊर्जेपासून हनुमान आपली रक्षा करतात.
 
3. जर आपण शनिवारी शनि देवाचं नाव घेऊन बाथरूममध्ये मीठ ठेवता तर शनिदेव प्रसन्न होतात आणि घरात येणार्‍या नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखतात.
 
4. कधीही देवघरात मीठ ठेवू नये, वास्तुप्रमाणे असे करणे अशुभ मानले गेले आहे. मीठ नेहमी काच किंवा मातीच्या दगडीतच ठेवावे. मीठ कधीही प्लास्टिक, स्टील किंवा लोखंडी डब्यात ठेवू नये.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या
 
फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती