Vastu Tips पक्ष्यांमुळे येते घरात सकारात्मक ऊर्जा

मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (09:30 IST)
आम्हा सर्वांना घरात शांतीचे वातावरण पाहिजे असते. कुटुंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक त्रास नको व्हायला. आर्थिक संकट देखील यायला नाही पाहिजे. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या घरात वास्तू दोष असू शकतो. वास्तू दोष आमच्या दिनचर्येवर सरळ प्रभाव टाकतो. घरात उपस्थित वास्तू दोषांना दूर करून आम्ही आमच्या कुटुंबीयांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवू शकतो. याचा सरळ प्रभाव आमच्या व्यक्तित्व आणि कामांवर पडतो. तर जाणून घेऊ काही सोप्या आणि उपयोगी वास्तू उपायांबद्दल.   
 
पक्ष्यांसाठी घराच्या छतावर भांड्यात पाणी आणि धान्य ठेवा, ज्यामुळे पक्ष्यांना भोजन पाणी मिळेल. वास्तूनुसार पक्षी आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा आणतात, ज्यामुळे धन आणि आरोग्यासंबंधी बाधा दूर होण्यास मदत मिळते. घरात नेहमी शांतीचे वातावरण ठेवा.
  
घराला नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या मुख्य दारावर रात्री देखील पर्याप्त प्रकाशाची व्यवस्था असायला पाहिजे. 
 
स्नानादी नंतर सूर्यदेवाला जल अर्पित करणे आपल्या दिनचर्येत सामील करा. रोज सकाळ संध्याकाळी घरात काही वेळेपर्यंत मंत्रांचा जप करा.  
 
घराच्या मुख्य दारावर आरसा लावू नये तसेच मुलांना अभ्यास करताना जोडे मोजे नाही घालायला पाहिजे.  
 
स्मरण शक्ती वाढवण्यासाठी तुळशीच्या पानात मिश्री घालून त्याचे सेवन केले पाहिजे. 
 
मुलांच्या अध्ययन कक्षात सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती पूर्व दिशेत लावायला पाहिजे. श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक बुधवारी बेसनाच्या लाडूचा प्रसाद दाखवायला  पाहिजे. घरात हिरवेगार झाड झुडपं लावायला पाहिजे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती