- पश्चिमेला चुकीच्या पदात दरवाजा असेल तर धनहानी, पुत्रहानी, शासनभय, दुर्भाग्य, शोक, शोषण, डाव्या पायाचं दुखणं किंवा इजा अशी फळं मिळतात. ब्लाडर-गाल ब्लाडर-स्टमक, लीव्हर यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
उपाय :
- उंबरठय़ाखाली सात लीडची व सात स्पायरॅलिग स्वस्तिक टाकून दिग्बंधन करावं.
- दरवाजासमोर पाचू रत्न निक्षेप करावं. त्याला आसन म्हणून लीडचं स्वस्तिक वापरावं.
- दरवाजासमोर कोणत्याही बुधवारी ७५0 ग्रॅम ब्राँझ पुरावं.
- चांदीच्या पत्र्यावर मगर कोरून ती दरवाजाकडे पाठ येईल अशाप्रकारे निक्षेप करावी.
- दाराच्या भिंतीवर घरात शनितारका यंत्र लावावं.
- दरवाजाच्या आसपास गडद हिरव्या व पोपटी रंगाची योजना कोणत्याही माध्यमातून करावी.
- धातूचे दोन हत्ती दरवाजाच्या मागे ठेवावेत.
- दाराच्या डोक्यावर सीलिंगला १६ चौकोनी पिरॅमिडची रचना करावी.
- उंबरठय़ासमोर येलो जैसलमेरची लादी घालावी. लादीखाली वर सांगितल्याप्रमाणं पाचू रत्न असेल. छताला जे पिरॅमिडचं डिझाईन आपण लावणार आहोत, त्यातील मधल्या पिरॅमिडच्या खाली हा पाचू येईल, असं पाहावं.
- दार डिझाईनचं करणार असाल तर चौकोनी आकारांचा वापर करावा.
- चौकटीवर वरच्या बाजूला वास्तुसंजय यंत्र लावावं. चौकटीवर खोबण करून मंगलकलश ठेवावं. (पानं अशोकाची वापरावीत)