Vastu Direction रोज सकाळ संध्याकाळ पूजा केल्याने घरात सकारात्मकता राहते. मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. यासाठी घरामध्ये मंदिर बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, जाणून घ्या अशा काही गोष्टी, ज्यांची घरातील मंदिरात काळजी घेतली पाहिजे...
पूजा कक्षात केवळ पूजेशी संबंधित साहित्य ठेवावे. इतर कोणत्याही वस्तू ठेवणे टाळा.
घराच्या मंदिराजवळ शौचालय असणे देखील अशुभ आहे. त्यामुळे जवळपास शौचालय नसेल अशा ठिकाणी पूजागृह बनवावे.