अशी मान्यता आहे की गणपती, महादेव, विष्णू, दुर्गा आणि सूर्याची पूजा रोज करायला पाहिजे. सूर्याला प्रसन्न केल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यात सुधारणा येते. प्रात: स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पित करायला पाहिजे. ज्या घरात सूर्याचा प्रकाश योग्य प्रकारे येत नाही तेथे सूर्याची तांब्याची प्रतिमा लावायला पाहिजे. घरात जेथे किंमती वस्तू ठेवल्या आहेत, तेथे तांबत्याची सूर्याची प्रतिमा लावल्याने पैशांची कमी येत नाही.
घरातील पूर्व दिशेत सात घोड्यांच्या रथावर सूर्याचा फोटो लावायला पाहिजे.
सूर्याला जल अर्पित करण्यासाठी नेहमी तांब्याच्या पात्राचा वापर केला पाहिजे. या पात्राला वेगळेच ठेवायला पाहिजे. लाल वस्त्र धारण करून सूर्याला जल अर्पित करणे चांगले मानले जाते.