पलंगावर बसून जेवू नये, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेवण्याच्या या सवयी योग्य नाही

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (15:58 IST)
सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फार बदल झाले आहे. पूर्वीच्या काळी लोक जमिनीवर सुखासनात बसून जेवण करीत असे. जेवताना कोणाशीही संवाद साधत नव्हते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जेवण्याच्या सवयीचा परिणाम आपल्या ग्रहांवर पडत असतो. चला तर मग जाणून घ्या आपल्या दैनंदिन सवयी आणि त्यांचा आपल्यावर पडणारा प्रभाव. 
 
* कधीही पलंगावर बसून जेवू नये. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि राहू नाराज होतो.
 
* जेवताना टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं, चांगलं नसतं. यामुळे आपल्या श्वास नलिकेत अन्नाचे कण अडकण्याची भीती असते.
 
* जेवण करण्यापूर्वी आपले हात आणि पाय स्वच्छ धुऊन घ्यावे यामुळे हानिकारक जिवाणू किंवा जंत अन्नाद्वारे आपल्या पोटात जात नाही.
 
* घाई- घाईने अन्न ग्रहण करू नये. जेवण झाल्या- झाल्या लगेच पाणी पिऊ नये. 
जेवणाच्या 40 मिनिटानंतर पाणी पिऊ शकता. जेवण नेहमीच बसून करावं.
 
* जेवण संपविल्यावर काही लोकं ताटातच हात धुतात. असे केल्याने देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. चंद्र आणि शुक्र रागावतात. समृद्धी जाते.
 
* ताटात अन्न टाकणं हा अन्नाचा अपमान असतो. यामुळे अन्नपूर्णा रागावते.
 
* जेवण करताना आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे असावं.
 
* जेवण केल्यावर किंवा करण्याचा पूर्वी लघु शंका करावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती