मुख्य दारावर असावी श्रीगणेशाची मूर्ती

मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (09:32 IST)
घरात वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. अशात काही सोपे उपाय अमलात आणून वास्तुदोष दूर करता येतात. तर जाणून घ्या काय करावे-
 
घराच्या मुख्य दारावर श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो लावणे योग्य ठरेल. आपण दारावर ऊँ किंवा शुभ लाभ याचे चित्र देखील चिटकवू शकतात. याने घरावर 
 
देवतांची कृपा राहते. तसेच कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात म्हणून दाराजवळपास स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य दार नेहमी स्वच्छ असावे. 
 
मुख्य दारासमोर रात्री देखील पुरेसा प्रकाश असावा याची काळजी घ्यावी. प्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
 
दारासमोर सुंदर फुलांचे झाड लावणे योग्य ठरेल. असे करणे शक्य नसल्यास आपण तिथे पोस्टर देखील लावू शकता. तसेच घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड 
 
असल्यास ते लगेच काढून टाकावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती