बऱ्याच वेळा आपण सर्वजण एक गोष्ट अनुभवतो की अचानक कमावलेले पैसे निरुपयोगी खर्च होतात, वाचत नाही. कोणाला कर्ज देणे किंवा आजारपणात पैसे खर्च होतात. या शिवाय घरात अशांतता, वाद विवाद, भांडण आणि नकारात्मकता वाढू लागते. काम बिघडू लागतात. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. वास्तुशास्त्रात अचानक वाढ होणाऱ्या अशा घटना वास्तू दोषांमुळे होतात. वास्तू दोषांमुळे पैसे टिकत नाही. चला तर मग वास्तू दोषाचे कारण जाणून घेऊ या.