शयन कक्षात वास्तु दोष असल्यास संबंध दुरावतात

बुधवार, 20 जानेवारी 2021 (19:45 IST)
घरातील शयन कक्ष एक महत्त्वाची जागा असते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या शयनकक्षात कोणत्याही प्रकाराचा दोष असल्याने घरात अशांती येते. नवरा-बायकोमध्ये वितंडवाद होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून शयनकक्ष नेहमी वास्तुनुसार असावे. चला तर मग जाणून घेऊ या की वास्तुनुसार कोणत्या दिशेला आणि कसं असावे शयनकक्ष.
 
* कोणत्या दिशेला असावे शयनकक्ष -
वास्तुनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला शयनकक्ष बांधणे चांगले आहे. या शिवाय पश्चिम दिशेला देखील शयनकक्षाची बांधणी करू शकता. परंतु उत्तर-पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला शयनकक्ष बांधू नये.
 
* पलंग असा असावा-
तसे तर बहुतेक लोक लाकडी पलंग वापरतात पण काही लोकांकडे लोखंडी पलंग देखील वापरतात. वास्तुशास्त्रानुसार लाकडी पलंगच चांगला मानला आहे. धातूचा किंवा लोखंडी पलंग वापरू नये.
 
* पलंगाचा आकार -
पलंग अनेक आकारात येतात जसे की चौरस,अंडाकृती,वर्तुळ,आयताकृती .वास्तुनुसार शयनकक्षात नेहमी चौरस किंवा आयताकृती  पलंग असावा.वर्तुळाकार पलंग नसावा. पलंगाच्या खाली कधीही चपला बूट काढू नये किंवा इतर सामान देखील ठेवू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती