वास्तूनुसार घरात ह्या तुटक्याफुटक्या वस्तू ठेवू नका

प्राचीन काळापासून घरात केले जाणारे कार्य आणि वस्तूसंबंधी काही प्रथा प्रचलित आहेत. बहुतांश घरांमध्ये तुटल्या-फुटलेल्या वस्तू एखाद्या कोपर्‍यात किंवा माळ्यावर पडलेल्या असतात. शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुटल्या-फुटलेल्या स्थितीमध्ये घरात ठेवू नयेत. या वस्तूंमुळे आर्थिक अडचणी वाढतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.
 
अनेक लोक घरात तुटले-फुटलेले भांडे ठेवतात, ज्यांचा अशुभ प्रभाव पडतो. शास्त्रानुसार घरामध्ये फुटलेले भांडे ठेवू नयेत. अशा भांड्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.
 
टलेला आरसा घरात असणे हा वास्तुशास्त्रानुसार एक दोष आहे. या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते.
 
वैवाहिक जीवनात सुख-शांती राहण्यासाठी पती-पत्नीचा पलंग तुटलेला नसावा. जर पलंग तुटलेला असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.
 
खराब, बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवू नये. असे मानले जाते की, घड्याळांच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती निश्‍चित होते. 
 
घरामधील घड्याळ व्यवस्थित नसल्यास कुटुंबातील सदस्यांना काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतील आणि काम वेळेवर पूर्ण होणार नाही.
 
घरामध्ये एखादी फोटो फ्रेम तुटलेली असेल तर, अशी फ्रेम घरामधून काढून टाकावी. वास्तूनुसार हा एक वास्तुदोष आहे.
 
घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असेल तर, अशी वस्तू घरामधून काढून टाकावी. असे सामान घरामध्ये ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो.
 
घराचा मुख्य दरवाजा किंवा इतर रूमचे दार तुटलेले असेल तर, असे दरवाजे लगेच व्यवस्थित करून घ्यावेत. दरवाजामध्ये तूट-फूट असल्यास वास्तुदोष निर्माण होतो.
 
घरातील फर्निचर व्यवस्थित असावे. वास्तूनुसार फर्निचरमध्ये तूट-फूट अशुभ मानली जाते.
 
घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या ठिकाणी पैशांची कमतरता राहते.
 
नेहमी लक्षात ठेवा की, घरातील उत्तर-पूर्व भाग नेहमी रिकामा ठेवावा. या ठिकाणी सामान ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो.
 
घरातील जड आणि अनावश्यक सामान घराच्या दक्षिण-पश्‍चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान ठेवणे वास्तूनुसार अशुभ मानले जाते.
 
घरात किंवा बाथरूममध्ये पाण्याचा सप्लाय उत्तर-पूर्व दिशेकडून करावा.
 
पण्याच्या खोलीमध्ये पलंगावर तुमचे डोकं दक्षिण आणि पाय उत्तर दिशेकडे असावेत. हे शक्य नसल्यास पश्‍चिम दिशेकडे डोकं ठेवून झोपावे.
 
वताना लक्षात ठेवा की, तुमचे मुख दक्षिण-पूर्व दिशेला असावे. असे केल्यास जेवणाची पूर्ण शक्ती प्राप्त होते आणि वास्तुदोष नष्ट होतात.
 
वास्तूनुसार सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देवघर उत्तर-पूर्व दिशेला असावे. जर अन्य दिशेला देवघर असेल तर पाणी ग्रहण करताना मुख ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे योग्य राहील.
 
मुख्य प्रवेश दारासमोर फुलांचा सुंदर फोटो लावावा.
 
घराच्या जवळपास सुकलेले झाड असेल तर ते तोडून टाका.

वेबदुनिया वर वाचा