सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात नारळ पावडर घाला आणि हलके परतवा.आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि चांगले मिसळा आणि ४-५ मिनिटे शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागले की, गुलाबाचे सिरप घाला आणि चांगले मिसळा. गॅस बंद करा आणि मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या. आता हातावर तूप लावा आणि छोटे लाडू बनवा. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि नैवद्य करा.
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि मावा घाला आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत परतवा. आता नारळ पावडर घाला आणि मिक्स करा आणि ३-४ मिनिटे परतून घ्या. वास येऊ लागला की, साखर पावडर आणि वेलची पावडर घाला. व चांगले मिसळा आणि गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. त्यात चिरलेले सुके मेवे घाला आणि छोटे लाडू बनवा. चविष्ट नारळ मावा लाडू नैवेद्यात ठेवा.