1 चमचा वेलची पूड
चिमूटभर जायफळ पूड
कृती
बारीक रवा आणि मैदा एकत्र करून तूपाचे मोहन घालून आणि दुध लावून घट्ट भिजवावे. हा गोळा 2 तास ठेवून द्यावा. नंतर या गोळ्याचे मुटकुळे करून तळून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यावं. नंतर जाड छिद्रांच्या चाळणीतून बारीक केलेला भुगा पुन्हा चाळून घ्यावा. त्यात पिठीसाखर मिसळावी. वेलची-जायफळ पूड घालावी. नंतर तुपाचा हात लावून लाडू वळावे.