शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी

रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (09:46 IST)
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या किरणांनी अमृत वर्षाव करतो. शरद पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रानंतर कोजागरी पौर्णिमेचा पवित्र सण येतो. या दिवशी खीर किंवा दुधाला चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. अशी आख्यायिका आहे की रात्र भर किंवा चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा दूध ठेवल्यानं हे अमृताच्या सम होऊन जात. या दुधाचे किंवा खिरीचे सेवन केल्यानं आरोग्यवर्धक फायदे मिळतात. आज आम्ही या लेखाच्या माध्यमाने चविष्ट खीर बनवायची रेसिपी सांगत आहोत. ही खीर चटकन चविष्ट देखील बनते. चला तर मग खीर बनवायची रेसिपी जाणून घेऊ या. 

साहित्य -
100 ग्रॅम तांदूळ, 2 लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, 1 चमचा वेलची पूड, 8 -10 बारीक कापलेले बदाम, 8 -10 बारीक कापलेले काजू, 1 चमचा चारोळ्या, 1 चमचा साजूक तूप.
 
कृती -
सर्वप्रथम आपण तांदुळाला स्वच्छ करून धुऊन घ्या. त्यातले पाणी उपसून चाळणीत 5 मिनिटासाठी ठेवावं, एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून त्यात तांदूळ घाला आणि मंद आचेवर तांदूळ परतून घ्या. 
 
एका भांड्यात दूध घ्या आणि उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळून झाल्यावर त्यामध्ये भाजलेले तांदूळ टाका. आता हे 8 ते 10 मिनिटे तांदूळ ढवळून शिजवायचे आहे. तांदूळ ढवळत राहावे जो पर्यंत ते गळत नाही. गळल्यावर त्यामध्ये साखर मिसळा. साखर विरघळून झाल्यावर सुकेमेवे घालावे. या खिरीला 8 ते 10 मिनिटा पर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या. खीर घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घाला आणि मोठ्या गॅस वर 2 मिनिटे शिजवा. आपली खीर तयार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती