Sharad Purnima 2022 कोजागिरी पौर्णिमेला शुभ योग, जाणून घ्या पूजा मुहूर्त

रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (09:28 IST)
दरवर्षी आश्‍विन महिन्याच्या पौ‍र्णिमेला शरद पूर्णिमा सण साजरा केला जातो. यंदा 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अती जवळ असतो. म्हणून आकाशातून अमृत वर्षा होत असल्याचे मानले जाते.
 
शरद पूर्णिमा कधी आहे | sharad purnima date and time : पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 03 वाजून 41 मिनिटांपासून सुरु होईल. ही तिथी 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 02 वाजून 25 मिनिटावर संपेल. अशात शरद पौर्णिमा 09 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
 
शरद पौर्णिमा शुभ योग | Sharad purnima shubh yog:
 
योग ध्रुव- संध्याकाळी 06:36 पर्यंत राहील नंतर व्याघात.
सर्वार्थ सिद्धि योग : सकाळी 06:31 ते संध्याकाळी 04:21 पर्यंत.
 
शरद पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त | Sharad purnima 2022 shubh muhurat:
 
अभि‍जीत मुहूर्त : सकाळी 11:45 ते 12:31 पर्यंत
अमृत काल : सकाळी 11:42 ते दुपारी 01:15 पर्यंत
विजय मुहूर्त : संध्याकाळी 02:24 ते 03:11 पर्यंत
गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:09 ते संध्याकाळी 06:33 पर्यंत
सायाह्न सन्ध्या : संध्याकाळी 06:20 ते रात्री 07:33 पर्यंत

Edited by: Rupali Barve

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती