उन्हाळाच्या दिवस सुरु झाले की बाजारात भरपूर खरबूज दिसू लागतात. अनेकदा त्याच्या वासामुळे लोक ते कापून खाणे पसंत करत नाहीत तर अनेकदा खरबूज फिकट निघतं ज्यामुळे त्याला चव येत नाही. परंतु आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आणि म्हणूनच खरबूजाचे शिकरण करून सेवन केल्याने ते फारच चवदार लागते. हे शिक्रण एखाद्या गोड पदार्थांपेक्षा कमी नाही. हे चपतीसोबत देखील खाता येते नाहीतर नुसतं देखील चविष्ट लागतं. विशेष म्हणेज यासाठी फार काही साहित्य देखील लागतं नाही अशात हे घरी पटकन तयार होतं आणि उन्हाळ्यात थंडगार डिश खाल्ल्याने तृप्त वाटतं. तर चला जाणून घेऊया शिकरण कशा प्रकारे तयार करावे.
साहित्य- 1 खरबूज, अर्धा वाटी साखर, 1 लहान चमचा वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे
कृती- खरबूचाला किसून घ्यायचे. त्यात साखर, वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स मिसळून घ्यायचे. साखर विरघळेपर्यंत हालवत राहयचे. गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. हवं तेव्हा काढून सर्व्ह करावे.