Mango Recipe : आंब्यापासून बनवा थंड मिठाई

मंगळवार, 4 जून 2024 (07:00 IST)
उन्हाळयात सर्वना थंड थंड खायला आवडते. अनेक जणांना आंबा हे फळ खूप आवडते. तर चला आज बनवू या आंब्यापासून थंड मिठाई, तर लिहून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
3 पिकलेले आंबे 
6 चमचे साखर 
1/4 कप कॉर्नफ्लोर 
1 कप पाणी 
नारळाचा किस 
 
कृती-
सर्वात आधी आंबे धुवून घ्या. मग त्यांचे साल काढून त्यांचे तुकडे करावे. मग हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यावे. तसेच त्यामध्ये साखर घालून परत बारीक वाटावे. तसेच यामध्ये परत कॉर्नफ्लोर टाकून एक वेळेस परत फिरवावे. सोबत पाणी घालावे ज्यामुळे मऊ पेस्ट तयार होईल. 
 
आता गॅसवर पॅन ठेऊन त्यामध्ये ही तय्यार पेस्ट घालावी. तसेच लहान गॅसवर हे मिश्रण शिजवावे. आंब्याचे हे मिश्रण काही वेळाने घट्ट होऊन जेली सारखे तय्यार होईल. आता एका बाऊलमध्ये तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. तसेच सात ते आठ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे घट्ट झाल्यानंतर नारळाच्या किसमध्ये याला मिक्स करून सर्व बाजूने नारळाचा किस लावावा. तर चला तय्यार आहे आपली मँगो थंड थंड मिठाई. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती