सर्वात आधी नॉन-स्टिक पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात आंब्याचा गर घाला आणि मंद आचेवर साधारण पाच मिनिट परतवा. आता आंब्याचा गर घट्ट होईपर्यंत आणि तव्याला चिकटणे थांबेपर्यंत परतून घ्या. भाजलेल्या आंब्याचा गरात दूध पावडर आणि साखर घाला आणि चांगले मिसळा. गुठळ्या होणार नाहीत याची खात्री करा. साखर विरघळेल आणि मिश्रण घट्ट होईल. मिश्रण तव्याला चिकटणे थांबेपर्यंत आणि एकत्र येईपर्यंत परतून घ्या. आता वेलची पूड घालावी. आता एक टेबलस्पून तूप घालून आणखी दोन मिनिटे परतून घ्या. यामुळे मिश्रण चमकदार होईल आणि चांगले सेट होईल. आता गॅस बंद करा आणि मिश्रण एका प्लेटवर पसरवा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. ते कोमट झाल्यावर हातावर थोडे तूप लावा आणि छोटे लाडू बनवा. प्रत्येक लाडूवर बारीक चिरलेले काजू आणि पिस्ता टाकून सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.