गुळाची पुरी

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:58 IST)
हिवाळ्यात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आहारावर लक्ष देण्याची जास्त गरज असते. शरीराला गरम ठेवणे आवश्यक आहे अशात आपल्याला गरम वस्तूंचे सेवन करावे. गुळाची चवही खूप गरम असते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात शरीरातील उष्णतेसाठी गुळाची पुरी रेसिपी सांगत आहोत. हे चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी-
 
 
गूळ पुरीची
 
गव्हाचं पीठ -2 कप
गुळ-1 कप
मीठ- चिमूटभर
बडीशेप-1/4 चमचा
पांढरे तीळ-2 चमचा (भाजलेले)
तूप-तळण्यासाठी
 
गुळ पुडी तयार करण्याची पद्धत -
 
-गुळाची पूडी बनवण्यासाठी सर्वात आधी गुळ चिरुन घ्या आणि पाण्यात दोन तासासाठी सोडून द्या.
-नंतर गुळाचं पाणी गाळून घ्या.
-नंतर एका बाऊलमध्ये गहू, मीठ, तीळ आणि तूप मिसळा.
-नंतर बडीशेप मिसळा आणि गुळाच्या पाण्यात कणिक मळून घ्या.
-हे 10 मिनिटासाठी तसेच राहू द्या.
-नंतर पुडीच्या आकारात लाटून तुपात तळून घ्या.
-गरम - गरम पुरी सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती