हिवाळ्यात गूळ आणि तिळाचे लाडू रोग प्रतिकारक शक्ती बळकट करतात,रेसिपी जाणून घेऊ या

शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:22 IST)
हिवाळ्यात अशा गोष्टींचा आहारात अनेकदा समावेश केला जातो, ज्यांची प्रकृती उष्ण असते  आणि खाल्ल्यास शरीरात देखील उष्णता राहते. तीळ आणि गूळ यांचाही समावेश अशाच गोष्टींमध्ये होतो. तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ खायला खूप चवदार असतात. तीळ आणि गुळाचे लाडू हिवाळ्यातील एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. भाजलेले तीळ, गूळ आणि केशर वापरतात. हे लाडू आपण घरीही अगदी सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया तिळाच्या गुळाचे हे चविष्ट लाडू कसे बनतात. 
 
साहित्य -
60 ग्रॅम पांढरे तीळ,
150 ग्रॅम - किसलेला गूळ
साजूक तूप- गरजेप्रमाणे 
 
कृती -
 तिळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ नीट स्वच्छ करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढईत तीळ सोनेरी होईपर्यंत परतून घ्या, त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी गरम केल्यानंतर त्यात गूळ घालून वितळवून घ्या. गूळ व्यवस्थित शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात थोडा शिजलेला गूळ घाला. असे केल्यावर पाण्यात गुळाचा गोळा तयार झाला तर तुमचा गूळ लाडू बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता गॅस बंद करा. आता गुळात भाजलेले तीळ घालून मिक्स करा. आता हे मिश्रण थोडं थंड होऊ द्या. यानंतर तिळाचे लाडू बनवण्यासाठी हाताला तूप लावून या मिश्रणाचे छोटे छोटे भाग करून गोल आकाराचे लाडू बनवा. तीळ आणि गुळाचे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार. हे लाडू बनवून हवाबंद डब्यात ठेवू शकता.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती