हिवाळ्यात नैसर्गिक चकाकी येण्यासाठी अशाप्रकारे स्किन केअर रूटीनमध्ये अक्रोडाचा समावेश करा

शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:17 IST)
अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण तर होतोच शिवाय सांधेदुखी आटोक्यात राहते, पण हे माहित आहे का की अक्रोडाचे अनेक फायदे देखील आहेत. अक्रोड फक्त  ग्लोइंग स्किन देत नाही, तर त्वचेच्या अनेक समस्याही याने दूर होतात. अक्रोड मध्ये प्रथिने, चरबी, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. इतकेच नाही तर त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, तांबे, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक देखील आढळतात, त्यामुळे अक्रोड केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही चांगले आहे.
 
1 फेसपॅक बनवून वापर करू शकता -
एक चमचा अक्रोड पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे गुलाबजल आणि अर्धा चमचा मध एकत्र करून फेस पॅक बनवा आणि पेस्ट बनवा  .
हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या.
कोरडे झाल्यानंतर, आपला चेहरा पाण्याने धुवा.
चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.
 
2 डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसाठी-  
अक्रोड तेल डोळ्यांखालील सूज दूर करते आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.
थोडे अक्रोड तेल घ्या. तेल गरम करून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा आणि झोपा . त्यानंतर नेहमी प्रमाणे सकाळी चेहरा धुवा. याचा प्रभाव दिसून येईपर्यंत ही प्रक्रिया दररोज रात्री अवलंबवा .
 
3 डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठी - 
लिंबाचा रस, मध, ओटमील आणि अक्रोड पावडर एकत्र मिसळून पेस्ट बनवा.
ही पेस्ट डोळ्यांखाली लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती