शिरा आवडतो तर हरबरा डाळीचा शिरा बनवून बघा

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (16:16 IST)
बहुतेक लोकांना गोड खाणे खूप आवडते पण ते आपल्या आरोग्याला लक्षात घेत जास्त गोड खाणे टाळतात. आज आम्ही आपल्याला जी रेसिपी सांगत आहोत ती चटकन बनते आणि पौष्टीक देखील आहे. कारण ही हरभऱ्याच्या डाळीपासून तयार केली जाते. चविष्ट असण्यासह ही आरोग्यासाठी देखील चांगली असते. आपण देखील करून बघा ही रेसिपी.
 
साहित्य -
1/2 कप चणा डाळ, 1/2 कप दूध, वेलची पूड, 1/2 कप साजूक तूप, 1/2 कप साखर, 6 बदाम.
 
कृती -
सर्वप्रथम डाळ धुऊन रात्र भर भिजत टाकावी. सकाळी डाळीचे संपूर्ण पाणी काढून वेगळी ठेवा. बदामाचे बारीक काप करुन घ्यावे. आता डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्या. 
 
आता कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तूप घाला. तूप वितळल्यावर वाटलेली डाळ घाला. चांगले सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्या.
 
 गॅस मध्यम करून एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यावर हे दूध डाळीच्या मिश्रणात घालून द्या आणि चांगल्या प्रकारे ढवळत राहा. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. मिश्रणाला ढवळत राहा जो पर्यंत या मधील दूध शोषले जाईल. 
 
या नंतर या मध्ये साखर, वेलची पूड टाकून मिश्रण ढवळत राहा. हे मिश्रण पातळ दिसू लागले आणि भांड्याच्या कडेपासून वेगळे होऊ लागेल तर समजावं की शिरा तयार झाला आहे. या मध्ये बारीक काप केलेले बदाम टाका. गरम शिरा सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती